गडहिंग्लज प्रतिनिधी : अभिनव ग्लोबल डिस्कव्हरी स्कूलमध्ये मंगळवार (ता-२८) रोजी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील तिसरी पालक सभा आयोजित करणेत आली होती. सभेला पालकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. यावेळी प्रथम पालकांचे स्वागत करण्यात आले तर नुकत्याच झालेल्या तिसऱ्या सायकल परीक्षेचा निकाल डिजिटल स्मार्ट बोर्ड व प्रोजेक्टरद्वारे पालकांना दाखविण्यात आला. वैयक्तिक पालक-शिक्षक संवाद आयोजित केल्यामुळे विद्यार्थांच्या प्रगतीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांनी केलेले विविध उपक्रम नोटीस बोर्डवर प्रदर्शित करण्यात आले. पालकांनी आपल्या पाल्याचा होत असलेला सर्वांगीण विकासाबद्दल समाधान व्यक्त केले आणि अभिनव ग्लोबल डिस्कवरी स्कूलच्या शैक्षणिक वाटचालीबद्दल व धोरणांबद्दल आश्र्वस्त असल्याचे मत व्यक्त केले. शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापिका पूजा पाटील यांनी स्वागत व समन्वयक श्रीमती विमल वांद्रे यांनी आभार मानले. यावेळी अभिनव ग्लोबल डिस्कवरी स्कूलचे अध्यक्ष डॉ.अमोल पाटील यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.