गडहिंग्लज प्रतिनिधी : अत्याळ (ता. गडहिंग्लज) येथील गंगुबाई विठ्ठू बाटे (वय ९०) यांचे मरणोत्तर नेत्रदान झाले. अत्याळ गावातील हे ३९ वे नेत्रदान आहे. गेल्या दोन महिन्यात चौघांचे नेत्रदान झाले आहे.
गंगुबाई बाटे यांचे आज सकाळी साडेआठच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. बाटे कुटुंबीयांचा चळवळीत सक्रीय सहभाग असतो. त्यांच्या नातेवाईकांनी गंगुबाई यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. येथील अंकूर आय बँकेच्या पथकाने अत्याळ येथे जाऊन नेत्रदानाची प्रक्रिया पार पाडली.
गंगुबाई बाटे यांच्या मागे दोन मुले, दोन मुली,सूना,नातवंडे असा परिवार आहे. सोमवारी (ता.१५) सकाळी नऊला रक्षाविसर्जन आहे. महालक्ष्मी एजन्सीचे मारुती बाटे यांच्या त्या आई तर दयानंद बाटे यांच्या आजी होत.