Home घडामोडी अभिनव ग्लोबल डिस्कवरी स्कूलची वार्षिक सहल : चिमुकल्यांनी लुटला प्राणी संग्रहालय व जंगल सफारीचा आनंद..!

अभिनव ग्लोबल डिस्कवरी स्कूलची वार्षिक सहल : चिमुकल्यांनी लुटला प्राणी संग्रहालय व जंगल सफारीचा आनंद..!

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : येथील अभिनव ग्लोबल डिस्कवरी स्कूलच्या चिमुकल्यांनी वार्षिक सहलीमधून प्राणी संग्रहालय व जंगल सफारीचा आनंद लुटला. प्राणी संग्रहालयामध्ये वाघ,सिंह,चित्ता,हरिण,अस्वल असे व इतर बरेच प्राणी तसेच मगरी,विविध प्रकारचे कासव त्याचप्रमाणे शहामृग,पांढरे मोर,कबूतर,विविध रंगाचे पोपट असे पक्षी जवळून पाहिले. तर वाघाला पाहण्यासाठीची जंगल सफारी खूप मोठे औत्सूक्य ठरले.

सहलीमध्ये नर्सरीच्या महिला पालकांचाही समावेश होता. पालकांसाठी छोटे फनी गेम्स,डान्स घेतले गेले. प्रवासामध्ये विद्यार्थ्यांनी,शिक्षिकांनी व पालकांनी अंताक्षरी,गायन,नृत्य अश्या ऍक्टिव्हिटी करत आनंदाने प्रवास केला. तसेच प्ले ग्रुपच्या मुलांची सहल साई मंदिर (गार्डन )येथे नेण्यात आली होती. त्यांनीही गाणी गात डान्स करत निसर्गाचा आनंद लुटला. शाळेचे अध्यक्ष डॉ.अमोल पाटील यांनी सहलीसाठी शुभेच्छा दिल्या तर सहलीमध्ये मुख्याध्यापिका पूजा पाटील तसेच सेंटर हेड श्रीमती विमल वांद्रे त्याचप्रमाणे शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Related Posts

Leave a Comment