Home मुख्य ‘संत गजानन’ अभियांत्रिकीला अग्रणी महाविद्यालयाचा दर्जा

‘संत गजानन’ अभियांत्रिकीला अग्रणी महाविद्यालयाचा दर्जा

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : महागाव (ता- गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाला शिवाजी विद्यापीठाने प्रमुख अग्रणी महाविद्यालय म्हणून निवड केली आहे.यामुळे आता विद्यापीठ कार्यक्षेत्रातील तेरा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे याबाबत नुकताच विद्यापीठाने महाविद्यालय पत्र पाठवून विविध उपक्रम राबविण्याचे सूचना दिले आहेत. या निवडीमुळे महाविद्यालयातील गुणवत्ता पुन्हा सिद्ध झाली आहे.

या अग्रणी कॉलेजच्या योजना द्वारे विद्यार्थी,शिक्षक,प्रशासकीय सेवक तसेच समाजाभिमुख उपक्रम राबवणे हा उद्दिष्ट असून आपल्या परिक्षेत्रातील महाविद्यालयातील गुणवत्ता सुधारणे, विविध शैक्षणिक कार्यक्रम आखणे, सांस्कृतिक,खेळ,करिअर मार्गदर्शन, विद्यार्थ्यांना रोजगार,प्रोजेक्ट, संशोधनासाठी चालना देण्यासाठी सामुदायिक प्रयत्न करणे सामज्यंश कराराद्वारे भेटीगाठी,आदानप्रदान एकसूत्रीपणा राहण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहणे हा मुख्य हेतू आहे.

याकामी प्राचार्य डॉ.संजय सावंत, विविध विभाग प्रमुख व शिक्षकांचे विशेष कौतुक होत आहे. यावेळी संस्थाध्यक्ष ॲड.अण्णासाहेब चव्हाण विश्वस्त डॉ.संजय चव्हाण,डॉ.यशवंत चव्हाण,ॲड.बाळासाहेब चव्हाण यांनी महाविद्यालयाला भेट देऊन विविध मार्गदर्शक सूचना करीत सर्व अभियांत्रिकी टीमचे अभिनंदन केले.

Related Posts

Leave a Comment