गडहिंग्लज प्रतिनिधी : बेळगुंदी (ता. गडहिंग्लज) येथील लता तानाजी मगदूम (वय ७५) यांचे मरणोत्तर नेत्रदान झाले. बेळगुंदी गावातील हे १८ वे नेत्रदान आहे. तर गावात गेल्या सहा महिन्यात पाचवे नेत्रदान झाले आहे.
लता मगदूम यांना आज पहाटे हृदयविकाराचा धक्का बसला. त्यांना तातडीने उपचारासाठी येथील खासगी रुग्णालयात आणण्यात आले. पण, त्यांचा मृत्यू झाला होता. मगदूम कुटुंबीयांना त्यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. येथील अंकूर आय बँकेच्या पथकाने बेळगुंदीत जावून नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण केली. लता मगदूम यांच्या मागे मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. गुरुवारी (ता.१८) सकाळी नऊला रक्षाविसर्जन आहे.