Home घडामोडी राज्यस्तरीय महात्मा ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार ‘प्रशांत गुरव’ यांना प्रदान

राज्यस्तरीय महात्मा ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार ‘प्रशांत गुरव’ यांना प्रदान

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : आजरा तालुका पेन्शनर संस्था,आजरा व साहित्य सेवा संस्कृती मंडळ,उत्तूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पेन्शनर डे’ निमित्त व्यंकटराव हायस्कूल,आजराचे सहाय्यक शिक्षक प्रशांत सुभाष गुरव यांना राज्यस्तरीय महात्मा ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शैक्षणिक,सामाजिक,सांस्कृतिक,कला,क्रीडा,आरोग्य,तज्ञ मार्गदर्शक,विज्ञान प्रदर्शन,स्पर्धा परीक्षा,अशा विविध क्षेत्रातील अष्टपैलू कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष उमेशराव आपटे व प्रमुख वक्ते अशोक येजरे (सिंधुदुर्ग मराठा शिक्षक संघ सल्लागार) उपस्थित होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विश्वासराव देसाई, चंद्रकांत पवार,हिंदुराव पाटील (अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा सेवानिवृत्त संघटना) किरण आमनगी (सरपंच उत्तुर) बी.जे.पोतदार (सचिव, सरस्वती शिक्षण मंडळ) जी. डी.यमगेकर (माजी अभियंता पाटबंधारे खाते) उपस्थित होते. सदरचा कार्यक्रम उत्तुर विद्यालय,उत्तुर येथे संपन्न झाला.

आजरा तालुका पेन्शनर्स संस्थेचे अध्यक्ष बी.डी.ढोणूक्षे,उपाध्यक्ष महंमदगौस तकीलदार,सरचिटणीस एस.टी.हळवणकर,कार्यकारणी सदस्य एस.जी.इंजल,के.एम.पाकले, व्ही.एस.कांबळे,एस.जी.देसाई, व्ही.आर.बुवा,आशा खटावकर व इतर स्थानिक कमिटी सदस्य यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी व्यंकटराव हायस्कूलचे प्राचार्य व सर्व सहाय्यक शिक्षक उपस्थित होते. आजरा महाल शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतरावजी शिंपी व सर्व संचालकांचे प्रेरणा व प्रोत्साहन मिळाले.

Related Posts

Leave a Comment