Home मुख्य ‘गडहिंग्लज युनायटेड’ चा संघ यवतमाळला रवाना : सतरा वर्षाखालील राज्यस्तरीय स्पर्धा

‘गडहिंग्लज युनायटेड’ चा संघ यवतमाळला रवाना : सतरा वर्षाखालील राज्यस्तरीय स्पर्धा

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल स्कुलचा सतरा वर्षाखालील संघ आज यवतमाळला रवाना झाला. बुधवार (ता. २२) पासून होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत हा संघ सहभागी होणार आहे. मोरघडे स्टेडियमवर होणाऱ्या स्पर्धेत सोळा संघाचा सहभाग आहे. पाच दिवस चालणाऱ्या स्पर्धेसाठी एकुण पाऊण लाख रुपयांची पारितोषिके आहेत.

खेळाडूंना अधिक सामने खेळण्याच्या संधी मिळाव्यात म्हणून युनायटेड मार्फत जाणीवपुर्वक देशभरातील स्पर्धांसाठी संघ पाठविले जातात. यवतमाळला जाणाऱ्या खेळाडूंना युनायटेडचे खजिनदार माजी जेष्ट खेळाडू महादेव पाटील यांच्या उपस्थित शुभेच्छा देण्यात आल्या. एम. आर. हायस्कुलच्या मैदानावर हा कार्यक्रम झाला. सागर पोवार यांनी स्वागत केले. युनायटेडचे सचिव दिपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकात गेल्या वर्षभरापासून डेव्हलपमेंन्ट संघासाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

संघाचे व्यवस्थापक सुल्तान शेख, कर्णधार आयर्न दळवी यांना श्री पाटील यांनी गुलाबाचे रोपटे देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी तानाजी देवेकर, प्रसन्न प्रसादी, अनिकेत कोले यांच्यासह खेळाडू उपस्थित होते. समर्थ यादव यांनी
शुभेच्छासाठी कृतज्ञता व्यक्त केली. ओमकार घुगरी यांनी आभार मानले.
स्पर्धेसाठी विजेत्याला रोख ३१ हजार, उपविजेत्याला २१ तर तृतीय क्रमांकाला अकरा हजारांचे बक्षीस आहे. स्पर्धावीर आणि उत्कृष्ट खेळाडूंना सायकल भेट दिली जाणार आहे.

सहभागी संघ असा :- आयर्न दळवी,पवन गुंठे,सर्वेश मोरे,महेश पोवार,पार्थ म्हेत्री,सौरभ शिंदे, अवधुत चव्हाण,संदिप हिरेकुडी, समर्थ यादव,यश पाटील,सुमित कांबळे,हर्षल कुरळे,सुहास पाटील,
विद्य़ाधर धबाले,प्रसाद पोवार, सुशांत देवार्डे,श्रवण पाटील.

Related Posts

Leave a Comment