गडहिंग्लज प्रतिनिधी : येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि शमनजी ग्रुप ऑफ इन्सटिट्युटतर्फे सुरु असलेल्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत आज गोव्याच्या सेसा अँकाडमी आणि एफसी गोवा संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यांनी अनुक्रमे यजमान गडहिंग्लज युनायटेड आणि मुंबईच्या जेवायएम-जीएमएससी क्लबचे आव्हान संपुष्टात आणले. उद्या (ता.२१) दुपारी दोन वाजता तिसरा क्रमांकाचा तर साडे तीन वाजता अंतिम सामना होणार आहे. एम.आर. हायस्कुलच्या मैदानावर स्पर्धा सुरु आहे.
दुपारच्या सत्रातील पहिल्या उपात्यं सामन्यात युवा खेळाडूंचा भरणा असणाऱ्या एफसी गोव्याने अनुभवी मुंबईला टायब्रेकरमध्ये ४-३ असे नमविले. छोट्या पासेसचा वापर करून एफसी गोव्याने मुंबईला जेरीस आणत टायब्रेकरपर्यंत रेटले. टायब्रेकरमध्ये मुंबईच्या दोघांना दिशाहिन फटके मारून संघाच्या पराजयावर शिक्कामोर्तब केले. गोव्यातर्फे वेस्ली डायस, अशीर रॉडिक्ज,मार्विन फर्नाडिस,ईस्माईल शेख यांनी तर मुंबईच्या अक्षय प्रशालीकर,हर्षल कार्ले,नयन कायवे यांनाच गोल करता आले.
दुसऱ्या सामन्यात गोव्याच्याच सेसा अँकाडमीच्या जोसूस डिसिलव्हाने उतरार्धाच्या ७४ व्या मिनिटाला मैदानी गोल करून युनायटेडचा प्रतिकार मोडून काढला. पुवार्धात युनायटेडच्या गोरलक्षक अमर गवळी, बचावपटू सुल्तान शेख, ओमकार घुगरी,सुरज कोंडूस्करने गोव्याला गोलची संधी मिळू दिली नाही. उत्तरार्धात उजव्या बगलेतील बचावातील ढिलाईचा फायदा घेत
जोसूने गोल करून संघाचा उत्साह वाढविला. यानंतर युनायटेडने आक्रमक पवित्रा घेतला,पण तोपर्यंत सामन्याची वेळ संपली.
अंतिम सामन्यानंतर शमनजी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष रियाज शमनजी,गोकुळच्या संचालिका अंजना रेडेकर,नविद मुश्रीफ,
काशिनाथ शिंदे,सतीश घाळी,राहुल मणियार,प्रकाश मोरे,विनोद बिलावर,घोडावत समुहाचे प्रविण रेंदाळे यांच्या उपस्थितीत
पारितोषिक वितरण आहे.
उद्याचे सामने
१) गडहिंग्लज युनायटेड वि. मुंबई दु. २ वा.
२) सेसा अँकाडमी गोवा वि. गोवा एफसी दु. ३.३० वा.