Home सामाजिक गडहिंग्लजला संत बाळूमामा मंदिर आवारात दत्त मंदिराची पायाभरणी संपन्न

गडहिंग्लजला संत बाळूमामा मंदिर आवारात दत्त मंदिराची पायाभरणी संपन्न

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : येथील श्री संत बाळूमामा देवस्थान संस्थानच्या परमपवित्र आवारात स्वयंभु औदु़ंबराच्या छायेत साकारत असलेल्या श्री दत्तात्रेय देवाच्या मंदिराचा पायाभरणी समारंभ कसबा नूल येथील श्री रामनाथगिरी समाधी मठाचे मठाधिपती परमपूज्य श्री भगवानगिरी महाराज यांच्या अमृत हस्ते करण्यात आली.

यावेळी श्री संत बाळूमामा देवस्थान सेवा संस्थानचे अध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष रमेश रिंगणे,उपाध्यक्ष सहदेव पडदाळे, सचिव माजी नगरसेवक इंजिनिअर चंद्रकांत सावंत, ज्येष्ठ पंच आप्पासाहेब बस्ताडे,पंच जयसिंग पवार, श्री महालक्ष्मी देवीच्या चांदीच्या पालखी समितीचे अध्यक्ष सुधीर पाटील (खातेदार),माजी नगरसेवक बाळासाहेब गुरव,बाळुमामा काडापुरे,रावसाहेब कुरबेट्टी,दयानंद रिंगणे,बाळासाहेब कुरबेट्टी,अभिजित रिंगणे,साहिल पाटील,अर्चना रिंगणे,तेजस्विनी जगदाळे,निता निऊंगरे,योगेश्वरी फुटाणे,सरीता पाटील,अमिता पडदाळे यांच्यासह भाविक-भक्त उपस्थित होते‌.

Related Posts

Leave a Comment