Home घडामोडी प्रभू श्री.राम मंदिर लोकार्पण आनंदोत्सवाचा प्रसाद गडहिंग्लज शहरात घरोघरी वाटप करणार : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा बैठकीत निर्णय

प्रभू श्री.राम मंदिर लोकार्पण आनंदोत्सवाचा प्रसाद गडहिंग्लज शहरात घरोघरी वाटप करणार : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा बैठकीत निर्णय

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : प्रभू श्री.राम मंदिर लोकार्पण आनंदोत्सव म्हणून साजरा करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी यांची बैठक सकाळी १०:०० वाजता संपन्न झाली. सोमवार दिंनाक २२ जानेवारी रोजी सकाळी १२:१५ ते दुपारी १२:४५ अयोध्या येथील ऐतिहासिक प्रभू श्रीराम मंदिर वास्तुशांती व प्रभू श्रीराम यांचा मुर्तीची प्रतिष्ठापना या सोहळाचे लाईव्ह प्रक्षेपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयासमोर करण्यात येणार आहे.

तर सायंकाळी ६:३० वाजता छञपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्यासमोर महाआरती व आतिषबाजी तर ७:०० वाजता गडहिंग्लज नगरपरिषद प्रांगणात भजनाचा कार्यक्रम होणार आहे. गुरुवार पासुन गडहिंग्लज शहरातील आठ हजार कुंटूबांना प्रभू श्री.राम मंदिर लोकार्पण आनंदोत्सवाच्या प्रसादाचे वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले. असे विविध धार्मिक कार्यक्रम करण्याचे आयोजन आज झालेल्या बैठकीमध्ये ठरविण्यात आले.

बैठकीस किरण कदम,सुरेश कोळकी,बाळासाहेब घुगरे,उदय परीट,गुंडू पाटील,महेश सलवादे,अमर मांगले,संतोष कांबळे,दिपक कुराडे,प्रशांत शिंदे,महेश शिंदे,महेश गाडवी,स्वनिल गुरव,राजु जमादार,धनाजी कळेकर,चितामणी वाली,शितल माणगावे,शिवराज पाटील,संजय कडाकणे श्रीमती शारदा आजरी उपस्थित होते.

Related Posts

Leave a Comment