गडहिंग्लज प्रतिनिधी : सरोळी (ता. आजरा) येथील आप्पा तातोबा केसरकर (वय ७८) यांचे मरणोत्तर नेत्रदान झाले. सरोळी गावातील हे एकूण पाचवे तर महिनाभरातील दुसरे नेत्रदान आहे. आप्पा केसरकर यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची मुले शांताराम केसरकर व पोलीस उपनिरीक्षक विनायक केसरकर यांनी वडीलांचे मरणोत्तर नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला.
स्थानिक कार्यकर्त्यांनी येथील अंकुर आय बँकेची संपर्क साधला. त्यानंतर अंकुरच्या पथकाने सरोळी येथे जाऊन नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण केली. सरोळीत गेल्या तीन वर्षात नेत्रदान झाले नव्हते. मात्र महिनाभरात झालेल्या दोन नेत्रदानामुळे गावात चळवळीच्या कामाला पुन्हा गती मिळाली आहे. आप्पा केसरकर यांच्या मागे दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. उद्या (ता.९) सकाळी नऊला रक्षाविसर्जन आहे.