Home घडामोडी भविष्यात ‘डिजीटल मीडिया संघटना’ भरीव कामगिरी करेल : ना. हसन मुश्रीफ

भविष्यात ‘डिजीटल मीडिया संघटना’ भरीव कामगिरी करेल : ना. हसन मुश्रीफ

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : राज्याचे डिजीटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्यासह संघटना पदाधिकाऱ्यांनी आज कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची गडहिंग्लज येथील राष्ट्रवादी कार्यालयात सदिच्छा भेट घेतली.

भेटी दरम्यान पालकमंत्री मुश्रीफ यांनी कणेरी मठ येथे पार पडलेल्या डिजीटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या दुसऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाला महत्वाच्या कामानिमित्त उपस्थित राहिलो नाही तरी माझ्या सदिच्छा आपल्यासोबत असल्याचे सांगितले. तसेच येणारा काळ हा डिजिटल मीडियाचाच असल्याचे सांगत संघटनेला शुभेच्छा दिल्या. तर भविष्यात डिजीटल मीडिया संघटना भरीव कामगिरी करुन दाखवेल असे गौरवोद्गारही श्री.मुश्रीफ यांनी यावेळी काढले.

यावेळी महाराष्ट्र राज्य डिजीटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने,राज्य कार्यकारणी सदस्य प्रमोद मोरे,ज्येष्ट पत्रकार सुभाष धूमे,राज्य संघटक राजेश शिंदे,तेजस राऊत,पत्रकार नितीन मोरे यावेळी उपस्थित होते.

Related Posts

Leave a Comment