गडहिंग्लज प्रतिनिधी : गडहिंग्लज शहरात सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट गडहिंग्लज चॅप्टर आणि गडहिंग्लज ट्रॅफिक पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने हेल्मेट जनजागृती, सीट बेल्ट व रस्ता सुरक्षा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये रस्ता व वाहतूक नियमांबाबत जनजागृती निर्माण करणे हा होता.


सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट ही एक महाराष्ट्रीयन उद्योजग व व्यावसायिक यांची संस्था असून महाराष्ट्रीयन उद्योजकणा व्यवसाय वाढीसाठी मदत करते. समाजहितासाठी विविध उपक्रम राबविण्यावरही त्यांचा विशेष भर असतो. सामाजिक उपक्रम म्हणून हेल्मेट जनजागृती,सीट बेल्ट व रस्ता सुरक्षा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक रमेश मोरे यांनी रस्ता व वाहतूक नियमांचे महत्त्व, सुरक्षित वाहनचालना, हेल्मेट व सीट बेल्ट वापराचे फायदे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच अश्वथामा रेडेकर यांनी हेल्मेट वापर व रस्ता सुरक्षिततेबाबत विशेष मार्गदर्शन केले. तर यावेळी चेअरपर्सन मुरारी चिकोडे व पोलीस उपधीक्षक रामदास इंगवले यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात केली. रॅलीमध्ये योगेश देशपांडे,जितेंद्र रनणवरे,सुहास शिंदे, एम,आर,पाटील,डॉ.मयुरेश शिंत्रे,योगेश देशपांडे यांच्यासह क्लब मेंबर उपस्थित होते. शेवटी डॉ.अमोल पाटील यांनी आभार म्हणाले.



