Home Uncategorized रविवारी पंधरा वर्षाखालील फुटबॉल स्पर्धा : अभिजित चव्हाण स्मृती चषक

रविवारी पंधरा वर्षाखालील फुटबॉल स्पर्धा : अभिजित चव्हाण स्मृती चषक

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन मार्फत रविवारी (ता. ११ ) पंधरा वर्षाखालील आंतर अकादमी आंतर जिल्हा फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. एकदिवसीय या स्पर्धेत स्थानिक गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल स्कूलसह कोल्हापूर, मिरज, बेळगाव जिल्ह्यातील संघ सहभागी आहेत. साखळी आणि त्यानंतर बाद पध्दतीने हि स्पर्धा होईल. माजी खेळाडू अभिजित चव्हाण यांच्या स्मृतीपित्यर्थ हि स्पर्धा होत आहे. ‘लढा वयचोरी विरूध्द’ असे घोषवाक्य असणारी हि स्पर्धा जिल्हा परिषदेच्या क्रीडा संकुलावर असून स्पर्धेचे यंदाचे दुसरे वर्ष आहे.
कुमार खेळाडूंना सामने खेळण्याचा अधिक अनुभव मिळावा अशा उद्देशाने गतवर्षापासून या स्पर्धेची सुरुवात झाली आहे.

स्थानिक खेळाडूंना परगावच्या खेळाडूंशी लढून खेळातील कौशल्यात सुधारणा करावी यासाठी हा प्रयत्न आहे. यजमान गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल स्कलूसह बेळगावचे मानस स्पोर्टस फौंडेशन, रेग एफसी, जेफसी क्लब यासह कोल्हापूर, मिरजेचे मंगळवार पेठ अकादमी स्पर्धेत सहभागी आहेत. प्रत्येक सामन्यातील विजयी संघातील खेळाडूस सामनावीर तर पराभूत संघातीतल खेळाडूस लढवय्या म्हणून क्रीडासाहित्य देऊन गौरविण्यात येईल. शौकींनानी उपस्थित राहून नवोदितांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन युनायटेडचे अध्यक्ष सुरेश कोळकी, उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी केले आहे.

युनायटेडचे कार्यकारी मंडळाचे माजी अध्यक्ष (कै ) अभिजित चव्हाण यांच्या स्म-तीपित्यर्थ या स्पर्धा होत आहेत. श्री चव्हाण यांनी नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन दिलेल्या योगदानाची नव्या खेळाडूंना माहिती व्हावी असा प्रयत्न आहे. प्रत्येकी तीन याप्रमाणे संघाची दोन गटात विभागणी आहे. साखळी पध्दतीने पहिला ठप्पा असून प्रत्येक गटातील दोन संघ उपांत्य फेरीत पोहचतील. उपात्यं फेरी, तिसरा क्रमांकाचा आणि त्यानंतर सायंकाळी अंतिम सामना होईल. भारतीय फुटबॉल क्षेत्राला वयचोरीची किड लागली आहे. त्याविरुद्ध रिलायन्स, बंगळूर एफसी, गोवा एफसी आदी राष्ट्रीय संघ एकवटले आहेत. या मोहिमेत या स्पर्धेच्या निमित्ताने ‘लढा वयचोरी विरूध्द’ याबाबत प्रबोधन करण्यात येणार आहे. समन्वयक सत्यम पाटील, रिहान अत्तार आणि सहकारी स्पर्धेचे नियोजन करत आहेत.

Related Posts

Leave a Comment