Home सामाजिक चन्नेकुप्पीत शैक्षणिक साहित्यांचे वाटप : ‘टिल्लू टॉम’ मंडळाचा कौतुकास्पद उपक्रम

चन्नेकुप्पीत शैक्षणिक साहित्यांचे वाटप : ‘टिल्लू टॉम’ मंडळाचा कौतुकास्पद उपक्रम

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : चन्नेकुप्पी(ता-गडहिंग्लज) येथील टिल्लू टॉम कला,क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबिवले जातात. तर गेल्या सहा वर्षांपासून नवरात्रोत्सव निमित्त ‘एक हात दुर्गामाता भक्तांच्या मदतीचा’ उपक्रम राबविला जात आहे. यंदाच्या नवरात्रोत्सवाला गावातील लोकांना उत्सवास येताना ‘एक वही व एक पेन’ घेऊन येण्याचे आवाहन केले होते. उत्सवा दरम्यान २५० वही,२५० पेन जमा झाले. हे साहित्य प्राथमिक शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वाटप केले.

यावेळी मंडळाचे अवधूत नेसरकर,अनिकेत कुरळे,भावेश निकम,इंद्रजित भुईबर यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते.

Related Posts

Leave a Comment