Home सामाजिक गडहिंग्लजमध्ये मंगळवारपासून बंगालशहावली बाबांचा उरूस : विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

गडहिंग्लजमध्ये मंगळवारपासून बंगालशहावली बाबांचा उरूस : विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : गडहिंग्लज(भैरी रोड शेजारी) येथील हजरत पीर बंगालशहावली बाबांच्या उरूसाला मंगळवार पासून सुरवात होणार आहे. उरुसानिमित्त सालाबादप्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन उरूस कमिटी मार्फत करण्यात आले आहे.

मंगळावर(ता-१४) रोजी सायंकाळी पाच वाजता अरीफ हावळे यांच्या घरातून मंडपमान,बुधवारी सायंकाळी सात वाजता आनंद बिलावर यांचे घरातून निशाण मिरवणूक, गुरुवारी भर उरूस व महाप्रसाद तर शुक्रवारी(ता-१७) रोजी गलेफ मिरवणूक अमिरअली मुजावर यांचे घरातून असे चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. समस्त भाविक-भक्तांनी होणाऱ्या उरुसामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन नदीम शेख व उरूस कमिटीमार्फत करण्यात आले आहे.

Related Posts

Leave a Comment