गडहिंग्लज प्रतिनिधी : अभिनव ग्लोबल डिस्कवरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना रंगांचे ज्ञान मिळण्यासाठी ‘आहा डे’ ज साजरा करण्यात आला. शाळेमध्ये पिवळ्या रंगाचे साहित्य मांडण्यात आले. विद्यार्थी पिवळ्या रंगांचे कपडे परिधान करून डोक्यावरती मास्टर शेफची टोपी घालून ‘वी आर मास्टर शेफ’ म्हणत मोठ्या औत्सुक्याने सहभागी झाले.
पालकांनी विद्यार्थ्यांच्या खाऊच्या डब्यांमध्ये देखील पिवळ्या रंगांचे विविध पदार्थ बनवून पाठविले होते. फूड ऍक्टिव्हिटीमध्ये भेळ हा पदार्थ शाळेच्या शिक्षिकांनी मुलांचा सहभाग घेऊन बनवला. सर्वांनी खमंग भेळचा आस्वाद घेतला. सेंटर हेड श्रीमती विमल वांद्रे यांनी मुलांना आहाराचे व स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. मुख्याध्यापिका पूजा पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले तर यावेळी सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेत्तर स्टाफ उपस्थित होता.