Home Uncategorized राजर्षी शाहू लोकरंग महोत्सव ‘टॅलेंट हंट’ स्पर्धेत गडहिंग्लजच्या जिजा शिवकालीन शस्त्रकला पथकाची बाजी

राजर्षी शाहू लोकरंग महोत्सव ‘टॅलेंट हंट’ स्पर्धेत गडहिंग्लजच्या जिजा शिवकालीन शस्त्रकला पथकाची बाजी

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : कागल येथील ‘राजर्षि शाहू लोकरंग महोत्सव’च्या माध्यमातून कागल तसेच पंचक्रोशीतील कलाकारांच्या कौशल्यांना वाव देण्यासाठी ‘टॅलेंट हंट’ स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत चिमुकल्यांपासून ते अगदी वयोवृद्ध कलाकारांपर्यंत सर्वांनी उत्तम सादरीकरण केले. तर तब्बल सात तास चाललेल्या टॅलेंट हंट स्पर्धेस प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. टॅलेंट हंट स्पर्धेतील विजेत्यांची नावे अनुक्रमे अशी :- खुला गट- जिजा शिवकालीन शस्त्रकला पथक(गडहिंग्लज)शांतीदूत मर्दानी आखाडा,(कागल), स्वरांजली वाघुडेकर,प्रवीण मोरे(दोघेही कागल) कृष्णात घुले(कसबा सांगाव),सानिका सावरे (गडहिंग्लज),अथर्व जोशी (कागल).

शालेय गट – श्रावणी पाटील (कागल), बोरवडे विद्यालय(बोरवडे), तनुष यादव (कागल),सुवर्णजीत मस्के (गडहिंग्लज) ज्ञानप्रबोधनी (बाचणी ),चेतन सुतार (गोरंबे), चिन्मयी कुंभार (अर्जुनवाडा)

Related Posts

Leave a Comment