Home सामाजिक शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : येथील शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे यांना शिवाजी विद्यापीठ मराठी समाजशास्त्र परिषदेच्यावतीने दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व मानपत्र देऊन प्रदान करण्यात आला. पाचगणी येथील मीनलबेन मेहता महाविद्यालय व शिवाजी विद्यापीठ मराठी समाजशास्त्र परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या अधिवेशनात हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला.

प्रा.किसनराव कुराडे यांच्या लेखन आणि संशोधन क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन त्यांना पुरस्कार देण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख प्रा.व्ही.एन.गजेंद्रगड यांना देखील जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी शिवाजी विद्यापीठ समाजशास्त्र परिषेदेचे अध्यक्ष तथा दलित महासंघाचे अध्यक्ष डॉ.मच्छिंद्र सकटे,स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे,महाराष्ट्र राज्य प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य क्रांतीकुमार पाटील,मीनलबेन मेहता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सतीश देसाई,डॉ.आर.व्ही.शेजवळ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.संजय साळुंके,शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे,शिवाजी विद्यापीठ समाजशास्त्र अभ्यास मंडळाच्या अध्यक्षा डॉ.अर्चना जगतकर,डॉ.आर.पी.हेंडगे यांच्यासह महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी अधिवेशनास उपस्थित होते.

Related Posts

Leave a Comment