Home सामाजिक डॉ.जयश्री तेलींच्या ‘स्त्री विकासाच्या दिशा व दशा’ पुस्तकास ‘उत्कृष्ट साहित्य पुरस्कार’

डॉ.जयश्री तेलींच्या ‘स्त्री विकासाच्या दिशा व दशा’ पुस्तकास ‘उत्कृष्ट साहित्य पुरस्कार’

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : करवीर साहित्य परिषद व संत गाडगेबाबा अध्यासन कोल्हापूर यांच्यावतीने डॉ. जयश्री संतोष तेली यांच्या ‘स्त्री विकासाच्या दिशा व दशा’ पुस्तकास ‘उत्कृष्ट साहित्य पुरस्कार’ मिळाला असून त्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन यावेळी गौरविण्यात आले.

करवीर साहित्य परिषद आणि संत गाडगे महाराज अध्यासन, कोल्हापूर यांच्यातर्फे साहित्य पुरस्कार वितरण समारंभ शिवाजी विद्यापीठाच्या भाषा भवन सभागृहामध्ये संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करवीर भूषण ज्येष्ठ साहित्यिक प्रा.चंद्रकुमार नलगे तर इंद्रजीत देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रयत शिक्षण संस्थेचे डाॅ.एम.बी शेख भारती विद्यापीठाचे कुलपती डाॅ.शिवाजीराव कदम,प्रसिद्ध उद्योगपती बाळासाहेब चकोते,संस्था अध्यक्ष एस.एन.पाटील,कोषाध्यक्ष एम.डी. देसाई,अध्यक्षा प्रा.डॉ.एस.बी.बिडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.

Related Posts

Leave a Comment