Home सामाजिक भडगावमध्ये उद्यापासून श्री सद्गुरू बाळूमामा एकादशी उत्सव : विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

भडगावमध्ये उद्यापासून श्री सद्गुरू बाळूमामा एकादशी उत्सव : विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : भडगाव(ता-गडहिंग्लज) येथे उद्यापासून श्री सद्गुरू बाळूमामा एकादशी उत्सव साजरा होणार असून एकादशी उत्सवानिमित्त बुधवार व गुरुवार असे दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

बुधवारी(ता-१७) रोजी सकाळी ८ वाजता भजनसेवा,९ वाजता श्री बाळूमामाची पालखी मिरवणूक,सायंकाळी ५ ते ८ वाजेपर्यंत धनगरी ढोल वादन त्यानंतर आरती तर रात्री ९ वाजता संत बाळूमामा चरित्र गाण्याचा कार्यक्रम, ११ वाजता धनगरी ओव्या व हरी भजन कार्यक्रम.

गुरुवार(ता-१८) रोजी पहाटे अभिषेक,काकड आरती,महाआरती तर १० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.सदरचे सर्व कार्यक्रम नवीन बिरदेव मंदिर,ए.डी.शिंदे कॉलेज जवळ,भडगाव येथे आयोजित करण्यात आले असून भाविक-भक्तांनी त्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन कमिटी मार्फत करण्यात आले आहे.

Related Posts

Leave a Comment