Home सामाजिक डॉ.नंदाताई बाभूळकर यांना ‘स्व.रत्नमाला घाळी नारीशक्ती पुरस्कार’

डॉ.नंदाताई बाभूळकर यांना ‘स्व.रत्नमाला घाळी नारीशक्ती पुरस्कार’

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : येथील विद्या प्रसारक मंडळ व जागृती हायस्कुल विद्यार्थी संघटना यांच्यावतीने देण्यात येणारा ‘स्व.रत्नमाला घाळी नारीशक्ती पुरस्कार’ यंदाच्या वर्षी डॉ.नंदाताई बाभूळकर यांना जाहीर करण्यात आला. विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.सतीश घाळी यांनी पुरस्काराची घोषणा आज पत्रकार परिषदेत दिली. तर पुरस्कार प्रधान सोहळा १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी डॉ.घाळी सभागृहात होणार आहे.

गडहिंग्लजच्या शैक्षणिक,सामाजिक, सांस्कृतिक,आध्यात्मिक व सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्याचा ठसा असणाऱ्या स्व. रत्नमाला घाळी(वहिनी) यांच्या कार्याचा वसा आणि वारसा चिरंतन रहावा या उद्देशाने विद्या प्रसारक मंडळ व जागृती हायस्कुल विद्यार्थी संघटना यांच्यावतीने ‘स्व.रत्नमाला घाळी नारीशक्ती पुरस्कार’ देण्यात येतो. यंदाच्या वर्षी सदरचा पुरस्कार डॉ.नंदाताई बाभूळकर यांना जाहीर करण्यात आला आहे. डॉ.नंदाताई बाभूळकर यांच्या वैद्यकीय, सामाजिक,राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची नोंद घेऊन समितीमार्फत पुरस्काराची घोषणा करण्यात आली. पुरस्कार प्रधान १८ फेब्रुवारी रोजी मधुरीमाराजे छत्रपती यांच्या शुभहस्ते होणार आहे. तर बसवकिरण स्वामी,माजी आमदार संध्यादेवी कुपेकर व संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश घाळी यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रधान सोहळा होणार असून पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन डॉ.सतीश घाळी यांनी केले आहे.

पत्रकार परिषदेला गजेंद्र बंदी,बी.जी.भोसकी,संगाप्पाना दड्डी,विकास पाटील,किशोर हंजी,डॉ.शिवकुमार कोल्हापुरे,प्राचार्य शिवानंद मस्ती व सुशांत घाळी उपस्थित होते.

Related Posts

Leave a Comment