गडहिंग्लज प्रतिनिधी : गडहिंग्लजच्या श्री.महालक्ष्मी यात्रा कमिटी,श्री.संत बाळूमामा- हालसिध्दनाथ मंदिर देवस्थान संस्थानचे अध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष रमेश रिंगणे यांचा वाढदिवस नागरी सत्काराने मोठ्या उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंत पाटील ( खातेदार) होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गडहिंग्लज ‘गोडसाखर’ चे व्हाइस चेअरमन प्रकाशराव चव्हाण होते. श्री.रामनाथगिरी समाधी मठाचे मठाधिपती परमपूज्य श्री.भगवानगिरी महाराजांच्या दिव्य सानिध्यात कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी समाजातील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. स्वागत व प्रास्ताविक माजी नगरसेवक चंद्रकांत सावंत यानी केले.
यावेळी धनसंपदा पतसंस्थेचे चेअरमन उदयराव जोशी,आजरा साखर कारखान्याचे चेअरमन प्रा.सुनिल शिंत्रे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष सिध्दार्थ बन्ने,ज्योतिर्लिंग शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रियाजभाई शमनजी,पंचायत समितीचे माजी सभापती अमरसिंह चव्हाण,ओंकार शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजन पेडणेकर,काॅंग्रेसचे शहर अध्यक्ष बसवराज आजरी,जनता दलाचे शहर अध्यक्ष व यात्रा कमिटीचे खजिनदार काशिनाथ देवगोंडा, शिवसेनेचे शहर अध्यक्ष संतोष चिकोडे यांची शुभेच्छापर भाषणे झाली.
सत्कारमुर्ती रमेश रिंगणे म्हणाले की लोकसहभागातूनच विविध लोकविधायक कामे पुर्णत्वाकडे गेली असुन बाळूमामा देवस्थानचे अन्नछत्राचे काम प्रगतीपथावर आहे. गडहिंग्लजसह पंचक्रोशीतील नागरिकांसाठी लवकरच लोकवर्गणीतून अत्याधुनिक सुसज्ज रुग्णवाहिका रूग्णसेवेत दाखल होत असल्याचे सांगत गडहिंग्लजकरांच्या प्रेमाने भारावून गेल्याने त्यांचे आभार न मानता त्यांच्या ऋणातच रहाण्याचे पसंद करेन असे सांगितले.
तर यावेळी भारतीय किसान संघाचे रामगोंडा पाटील यांची राष्ट्रीय कृषी आयोगावर निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास विठ्ठल भमानगोळ,डॉ.रविंद्र हत्तरकी,डॉ.आर.एस.पाटील,मनोज शेळके,राजू हंजी,काशिनाथ शेट्टी,ज्येष्ठ पंच आप्पासाहेब बस्ताडे, जयसिंग पोवार,राजू पोवळ, रावसाहेब कुरबेट्टी,अरविंद पाटील,अर्जून भोईटे,बाळासाहेब गुरव,दिलीप माने, संजय संकपाळ,आण्णासाहेब देवगोंडा, बाळासाहेब हिरेमठ,राजशेखर यरटे, सतीश पाटील,विद्याधर गुरबे, किरणराव कदम,रामगोंडा उर्फ गुंड्या पाटील,अमर मांगले,महेश सलवादे, सुभाष चोथे, राजेंद्र मांडेकर, प्रा.आशपाक मकानदार,आनंद पेडणेकर,अमरनाथ घुगरी,संदिप कुरळे,शिवाजी पाटील, भिमगोंडा पाटील, बी.बी.पाटील,सचिव सचिन पाटील,रमजानभाई अत्तार, जयानंद रिंगणे,प्रा.रमेश पाटील,संजय खोत,अरुण भोसले, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ,जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विनय कोरे (सावकर) व चंदगड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे नेते शिवाजीराव पाटील यांनी दुरध्वनीवरुन शुभेच्छा दिल्या.