Home राजकीय सरपंच संदीप पाटील,बसवराज आरबोळे यांना यशवंत सरपंच पुरस्कार जाहीर

सरपंच संदीप पाटील,बसवराज आरबोळे यांना यशवंत सरपंच पुरस्कार जाहीर

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत देण्यात येणारा तालुकास्तरीय यशवंत सरपंच पुरस्कार २०२३-२४ चा गडहिंग्लज विभागातून मौजे औरनाळ गावचे सरपंच संदीप पाटील व मौजे तनवडी गावचे सरपंच बसवराज आरबोळे यांना जिल्हापरिषदे मार्फत जाहीर करण्यात आला. तर यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार मौजे औरनाळ व मौजे तनवडी ग्रामपंचायतीला जाहीर करण्यात आला.

ग्रापंचायत व सरपंच यांच्या उत्कृष्ट कामाची दखल घेऊन दरवर्षी जिल्हा परिषदे मार्फत तालुकास्तरीय यशवंत ग्रामपंचायत व सरपंच पुरस्काराचे वितरण करण्यात येते. यंदाच्या वर्षी औरनाळ व तनवडी ग्रामपंचायतीस व औरनाळचे सरपंच संदीप पाटील व तनवडीचे सरपंच बसवराज आरबोळे यांना सरपंच पुरस्कार जाहीर करण्यात आला. पुरस्कार मिळाल्याने तालुक्यात दोन्ही गावच्या सरपंचांचे व ग्रापंचायतीचे सर्वच थरातून कौतुक होत आहे.

Related Posts

Leave a Comment