Home राजकीय श्री.शिवाजी सहकारी बॅंकेच्या ‘त्या’ जागेची लिलाव प्रकिया अखेर रद्द

श्री.शिवाजी सहकारी बॅंकेच्या ‘त्या’ जागेची लिलाव प्रकिया अखेर रद्द

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : गडहिंग्लज येथील श्री.शिवाजी सहकारी बॅंकेच्या शाखा साखर कारखाना साईट हरळी येथील इमारत व रिकामी जागेच्या लिलावा संदर्भात निविदा निघाली होती. तर निविदा फॉर्म एक ऑगष्ट ते आज अखेर भरावयाचे होते. पण बँकेच्या सभासदांनी सहकारमंत्री व प्रशासकांना निविदा रद्द करणेबाबत विनंती केलेनंतर जागा व इमारत विक्री निविदा रद्द केली.

श्री.शिवाजी सहकारी बँकेच्या हरळी शाखेची जागा व इमारत विक्री निविदा निघाली होती. १ ऑगष्ट ते २१ ऑगष्ट निविदा अर्ज दाखल करणेची मुदत होती. तर आज येथील बँकेच्या सभासदांनी संस्थेची कर्जवसुली व ठेवी यांचे प्रमाण उत्तम असल्याने प्रशासनकांना स्थावर लिलाव प्रक्रिया थांबविण्याची जोरदार मागणी केली असता; जनरल मॅनेजर रविंद्र भोसले यांनी प्रशासक तथा अवसायक व्ही.जी.जाधव यांच्याशी संपर्क करून निविदा थांबविण्या बाबतची सभासदांची मागणी असल्याची चर्चा केली. त्यानंतर रविंद्र भोसले यांनी निविदा प्रक्रिया रद्द केलेचे सभासदांना पत्र दिले.

गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन प्रकाशराव चव्हाण,माजी उपनगराध्यक्ष किरणराव कदम,माजी नगरसेवक इंजिनिअर चंद्रकांत सावंत,माजी नगरसेवक दिलीप माने,माजी संचालक प्रमोद रणनवरे,पंचायत समितीचे माजी सभापती अमरसिंह चव्हाण,माजी उपनगराध्यक्ष नितीन देसाई,माजी नगरसेवक उदय कदम, संजय मोकाशी,हिंदुराव नौकुडकर यांच्या शिष्टमंडळाने लिलाव प्रक्रिया रद्द होणेबाबतचे महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री यांच्या नावे निवेदन दिले. तर अवसायक तथा उपनिबंधक सहकारी संस्था शाहुवाडी, व्ही.जी. जाधव यांच्याशी भ्रमणध्वनीवर झालेल्या चर्चेनंतर निविदा -लिलाव प्रक्रिया रद्द झाली.

Related Posts

Leave a Comment