Home आरोग्य गिजवणेत झाले पहिले नेत्रदान : तालुक्यात नेत्रदान चळवळीला मिळतेय गती

गिजवणेत झाले पहिले नेत्रदान : तालुक्यात नेत्रदान चळवळीला मिळतेय गती

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथील मधुकर दत्तात्रय मुळे (वय ७५) यांचे मरणोत्तर नेत्रदान झाले. गिजवणे गावातील हे पहिलेच तर चळवळीतील ९३ वे नेत्रदान ठरले. गिजवणेसारख्या मोठ्या गावात नेत्रदान झाल्याने चळवळीला बळ मिळाले आहे.

गडहिंग्लज तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या दहा वर्षांपासून मरणोत्तर नेत्रदान चळवळ जोमाने सुरू आहे. या परिसरातील अत्याळ, बेळगुंदी, इंचनाळ, ऐनापूर, कौलगे, हिरलगे, करंबळीसह आजरा तालुक्यातील लगतच्या सरोळी गावात नेत्रदान झालेली आहेत. मात्र, पश्चिम भागातील गिजवणे याला अपवाद होते.

दरम्यान, मधुकर मुळे यांना पहाटे हृदयविकाराचा धक्का बसला. उपचारासाठी खाजगी रुग्णालय दाखल केले होते पण, त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पूत्र सचिन मुळे यांना चळवळीची माहिती होती. त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांशी संपर्क साधून आपल्या वडिलांच्या मरणोत्तर नेत्रदानाची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर येथील अंकुर आय बँकेच्या पथकाने नेत्रदानाची प्रक्रिया पार पाडली. मधुकर मुळे गावातील केदारलिंग दूध संस्थेचे माजी अध्यक्ष होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Related Posts

Leave a Comment