Home Uncategorized ऑल इंडिया मूस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या गडहिंग्लज विभागीय अध्यक्षपदी अमजद मीरा

ऑल इंडिया मूस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या गडहिंग्लज विभागीय अध्यक्षपदी अमजद मीरा

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : ऑल इंडिया मूस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या गडहिंग्लज विभागीय अध्यक्षपदी अमजद मीरा यांची निवड झाली असून येथील शाहू सभागृहात ऑर्गनायझेशनतर्फे गडहिंग्लज विभागातील नुतन पदाधिकारी निवडी व निवडीचे पत्र प्रदान कार्यक्रम संपन्न झाला. राष्ट्रीय उपाध्यक्ष काशिम मुल्ला,प्रदेश सचिव जहांगीर हजरत,फिरोजभाई अत्तार,रमजान अत्तार,रियाज शमनजी यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.

गडहिंग्लज,आजरा,चंदगड विभागीय अध्यक्षपदी अमजद मीरा,गडहिंग्लज तालुका अध्यक्ष समीर राउत,गडहिंग्लज शहर अध्यक्ष इम्रान मुल्ला,चंदगड तालुका अध्यक्ष खलील अल्लाखान,चंदगड शहर अध्यक्ष इम्रान मुल्ला. आजरा तालुका अध्यक्ष मंजूर माणगावकर. आजरा शहर अध्यक्ष महमद रसूल शेख तालुका निहाय निवडी करण्यात आल्या व त्यांना निवडीचे पत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तसेच गडहिंग्लज शहर पदाधिकारी मंडळात उपाध्यक्ष म्हणून तरबेज जिनाबडे,सचिव युनूस नदाफ,खजिनदार जमीर मुल्ला यांना देखील निवडीचे पत्र देउन सन्मानित करण्यात आले.

यावेळी काशिम मुल्ला,जहांगीर हजरत,रमजान अत्तार व रियाज शमनजी यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. तर हैदर नदाफ, मन्सुर मुल्ला, समीर खडकवाले, रफिक पटेल, बाळासाहेब मुल्ला,आझाद पटेल,कबीर मुल्ला,हाजी इमत्याज नदाफ,शिंकदर यळकुद्रे,घडू शेख,फारूख ठगरी, इक्बाल शायन्नावर,नजीर पटेल,जावेद मकानदार,वसिम नाईकवाडे यांच्यासह गडहिंग्लज आजरा चंदगड भागातील पदाधिकारी उपस्थित होते. मुबारक नाईकवाडी यांनी सूत्रसंचलन केले तर आभार अमजद मिरा यानी मानले.

Related Posts

Leave a Comment