गडहिंग्लज प्रतिनिधी : समरजीत घाटगे यांचे गडहिंग्लज येथील खंदे समर्थक,बड्याचीवाडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व वस्ताद ग्रुपचे प्रमुख अजित पाटील- वस्ताद व त्यांच्या पत्नी प्रतिभा अजित पाटील यांचा वस्ताद ग्रुपच्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.


मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते या सर्वांचा स्वागतपर सत्कार झाला. श्री पाटील यांच्या समवेत त्यांचे भाऊ संदीप सदाशिव पाटील,अक्षय शिंदे, सुनील डवरी,विनायक दोनवडे या प्रमुखांनी कार्यकर्त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

यावेळी गडहिंग्लज नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष किरणअण्णा कदम,माजी नगरसेवक उदय पाटील,माजी नगरसेवक दीपक कुराडे,संतोष चिकोडे आदी प्रमुखांसह कार्यकर्ते उपस्थित होते.



