Home Uncategorized गिजवणेत चाकू हल्ला करून ‘चोरी’ : महिला जखमी;कुरिअर बॉय असल्याचे सांगून घुसला घरात.!

गिजवणेत चाकू हल्ला करून ‘चोरी’ : महिला जखमी;कुरिअर बॉय असल्याचे सांगून घुसला घरात.!

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : गिजवणे(ता-गडहिंग्लज) येथे आज रात्री साडे आठच्या सुमारास चाकूचा धाक दाखवत व चाकू हल्ला करून रोख १५०००/- रुपयांची चोरी केली असून चाकू हल्ल्यात ७७ वर्षीय महिला जखमी झाली आहे. तर गडहिंग्लज पोलिसात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

अधिक माहिती अशी की आज(शुक्रवार) रात्री साडे आठच्या सुमारास अक्कममहादेवी बाबासाहेब पाटील(वय-७७,रा -पाटील गल्ली, जैन मंदिर जवळ,गिजवणे) यांच्या घरी कुरिअर बॉय असल्याचे सांगत अज्ञात युवक तोंडाला मास्क बांधून डोअर बेल वाजवत घरात घुसला. त्यानंतर त्याने सौ. पाटील यांना चाकूचा धाक दाखवत व तोंड दाबून धरून पैश्यांची मागणी केली त्यानंतर रोख १५०००/- घेऊन अक्कममहादेवी यांच्या हातावर, तोंडावर व डोक्यात चाकूने गंभीर वार करून पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच जखमी अक्कममहादेवी यांना गडहिंग्लज येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले तर त्यांच्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गडहिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास गडहिंग्लज पोलीस करीत आहेत.

Related Posts

Leave a Comment