गडहिंग्लज प्रतिनिधी : गडहिंग्लज येथील जडेयसिद्धेश्वर आश्रम बेलबाग येथे श्री बसव किरण स्वामीजी यांच्या यांच्या निरंजन पट्टाधिकार सोहळ्याचा शुभारंभ झाला. श्री अल्लमप्रभू स्वामीजी,श्री शिवलिंगेश्वर महा स्वामीजी,श्री गुरुसिद्धेश्वर स्वामीजी,श्री अभिनव मृत्युन्जयं स्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात या कार्यक्रमाची सुरुवात झाली. महात्मा बसवेश्वर, श्री अक्कमहादेवी यांच्या वचनाची ग्रंथदिंडी आणी दुरदूंडिश्वर ज्योतीची मंगलमय वातावरणात गडहिंग्लज शहरातून मिरवणूक काढण्यात आली.
आज सकाळी १० वाजता बेलबाग येथे शिवलिंगेश्वर स्वामीजींच्या हस्ते ध्वजरोहन पार पडले. सायं ५ नंतर महालक्ष्मी मंदिरापासून ग्रंथ दिंडीला मिरवणूकीने सुरुवात झाली. ग्रंथदिंडीला शहर व परिसरातील महिलांची संख्या लक्षणीय होती. १० दिवस चालणाऱ्या पट्टाधिकारचा वैभव सोहळ्याला सुरुवात झाली. सर्व स्वामीजींच्या हस्ते पट्टाधिकार सोहळ्याचे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामीजींच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. त्यानंतर मृत्युंजय स्वामींजींचा प्रवचनाचा कार्यक्रम पार पडला. संगमेश्वर पाटील आणि मल्लिकार्जुन हुगार यांनी आपल्या संगीत कार्यक्रमाने श्रोत्यांना मंत्र मुग्ध केले. तर पुढील दहा दिवसात स्वामीजी आणि सर्व भक्तगण यांचेकडून पदयात्रा काढण्यात येणार आहे.
कार्यक्रमासाठी शहर व परिसरातून असंख्य भक्तमंडळींनी हजेरी लाविली होती. स्वागत आणी प्रास्ताविक राजशेखर दड्डी यांनी केले. मीना कोल्हापुरे,दत्ता पाटील यांनी सूत्रसंचलन केले. सर्व भक्तगण व पट्टाधिकार सोहळा सामितीच्या वतीने कार्यक्रमाचे नेटके नियोजन करण्यात आले होते.