Home व्यवसाय गडहिंग्लजमध्ये रोजगार पूर्व प्रशिक्षण व दिव्यांग आरोग्य मेळावे तर कागलला २५ तारखेला रोजगार मेळावा

गडहिंग्लजमध्ये रोजगार पूर्व प्रशिक्षण व दिव्यांग आरोग्य मेळावे तर कागलला २५ तारखेला रोजगार मेळावा

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : शिवजयंतीच्या निमित्ताने ना.हसन मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून गडहिंग्लज शहर व गिजवणे कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघासाठी रोजगार पूर्व प्रशिक्षण व दिव्यांग आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तर २५ फेब्रुवारी रोजी कागल येथील डी.आर.माने कॉलेजमध्ये मुख्य विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी नियोजन बैठक गडहिंग्लज शहर राष्ट्रवादी कार्यालयात शनिवारी(ता-१०) घेण्यात आली. यावेळी स्वागत रामगोंडा पाटील यांनी केले तर मेळाव्याच्या नियोजन संदर्भात माहिती अमर मांगले यांनी दिली. तर मेळाव्या बाबतीत सतीश पाटील व किरण कदम यांनी मनोगते व्यक्त केली.

गडहिंग्लज येथील सूर्या सांस्कृतिक भवन येथे बुधवार(ता-१४)रोजी सकाळी १० वाजता रोजगार पूर्व प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. यामध्ये दहावी,बारावी व कोणत्याही शाखेची पदवी,आय. टी.आय, इंजिनिअरिंग,डिप्लोमा आशा सर्व विभागातील बेरोजगार तरुणांना रोजगार पूर्व प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणा दरम्यान दिले जाणारे प्रशिक्षण म्हणजे कागलला होणाऱ्या २५ फेब्रुवारीची रंगीत तालीम असणार आहे. त्यामुळे मुख्य मेळाव्यास युवकांची मुलाखत होऊन त्यांना नोकरी मिळण्यास शक्य होणार आहे.

तसेच शुक्रवारी (ता-२३) रोजी सकाळी १०:०० वाजता दिव्यांग आरोग्य मेळाव्याचे आयोजन काळू मास्तर विद्यालय,शाळा नंबर-२,शिवाजी चौक,गडहिंग्लज येथे करण्यात आले आहे. यामध्ये दिव्यांग लोकांची तपासणी व साहित्य मोजमाप केले जाणार आहे. कृत्रिम हात,पाय,तीन चाकी सायकल,काठी,व्हीलचेअर वॉकर,कमी ऐकू येणाऱ्यांसाठी श्रवणयंत्रे तपासणी करून मेळावा झाल्यानंतर साहित्य वाटप ना.हसन मुश्रीफ यांच्या हस्ते केले जाणार आहे. त्याची तारीख मेळावा झालेनंतर जाहीर केली जाणार आहे. मेळाव्यास नामांकित कंपन्याचे प्रतिनिधी उपस्थित असणार आहेत. तरी बेरोजगार तरुण व दिव्यांग लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सतीश पाटील व किरण कदम यांनी केले आहे.

बैठकीस सतीश पाटील,किरण कदम,हरून सय्यद,गुंडू पाटील,नरेंद्र भद्रापूर,सिद्धार्थबन्ने,एस.आर.पाटील, महेश सलवादे,उदय परीट,बसवराज खणगावे,अमर मांगले,अनुप पाटील,राजु जमादार,उषा मांगले,बंटी पाटील,मिलिंद मगदूम,सदानंद पाटील, जितेंद्र कांबळे,आदित्य पाटील, विजयकुमार बुरगुडा,अशोक कुरळे,अशोक मेंडुले,शारदा आजरी,प्रशांत शिंदे,प्रशांत शिंदे, शिवाजी राणे,भीमराव राजाराम, शंकर घुगरे,रमेश गिरी,अमित इंगळे,अमित इंगळे,चिंतामणी वाली, शितल मानगावे,सदाशिव देसाई,तुकाराम देसाई,सादिक लमतुरे,प्रकाश गवळी,गजानन शिवणे, असलम नाईकवाडे,महेश मांगोरे,सुनील स्वामी,संजय कडाकणे,संजय कांबळे,बाळकृष्ण कुंभार व पांडुरंग पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Posts

Leave a Comment