Home सामाजिक मुगळी येथे शुक्रवारी भव्य विशाळी यात्रा : विविध कार्यक्रमांचे आयोजन

मुगळी येथे शुक्रवारी भव्य विशाळी यात्रा : विविध कार्यक्रमांचे आयोजन

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : मौजे मुगळी(ता. गडहिंग्लज), येथे संघर्ष, भगवा रक्षक,सहकार,शिवाजी संघ, श्रीनगर ग्रुप,गांधीनगर ग्रुप मराठा चौक व क्रांतीज्योत तरुण मंडळ यांच्या वतीने सालाबादप्रमाणे ‘विशाळी’ यात्रेचे आयोजन करण्यात आले असून यात्रेनिमित्य शुक्रवार दि. ९/२/२०२४ रोजी सकाळी ९ वा. ‘श्री लक्ष्मी’ देवीची ओटी भरणे, पुजापाठ व ठीक ११ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

तर कोल्हापूर जिल्हा कब्बडी असोसिएशनच्या मान्यतेन निमंत्रित
बुधवार दि. ७/२/२०२४ ते गुरुवार ८/२/२०२४ दरम्यान ७० किलो भव्य कबड्डी स्पर्धा घेण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक १५०००/-
द्वितीय क्रमांक १००००/- तृतीय क्रमांक ७०००/- अशी अनुक्रमे बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. तसेच शुक्रवार दिनांक ९/२/२०२४ रोजी सकाळी विविध स्पर्धेचे आयोजन तर रात्री ठीक नऊ वाजता ऑर्केस्ट्रा म्युझिकल कोल्हापूर झंकार बिट्स न्यू इंग्लिश स्कूल मुगळी येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व भाविक-भक्तांनी यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकामार्फत करण्यात आले आहे.

Related Posts

Leave a Comment