गडहिंग्लज प्रतिनिधी – जडेयसिद्धेश्वर आश्रम बेलबाग गडहिंग्लज येथे आजपासून पट्टाधिकार सोहळ्याला सुरुवात होत आहे. प पू बसव किरण स्वामीजी यांचा पट्टाधिकार सोहळा होत आहे. सोमवार (ता-५) पासून गुरुवार (ता-१५) पर्यंत सोहळा चालणार आहे.
सकाळी १० वाजता पंचम शिवलिंगेश्वर महस्वामीजी निडसोशी यांच्या अमृतहस्ते बेलबाग येथे षटस्थल ध्वजारोहण होणार आहे. दुरदूंडिश्वर सिद्ध संस्थान मठ निडसोशी येथून युवा भक्तमंडळींकडून दुरदूंडिश्वर ज्योत मोटर सायकल रॅली द्वारे आणली जाणार आहे. या ज्योतीचे हिटणी, हेब्बाळ, निलजी, मुत्नाळ, दूंडगे या ठिकाणी ज्योतीचे स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर ज्योतीचे गडहिंग्लज येथील बसवेश्वर पुतळ्याला अभिवादन करून नंजय्यामठ मंदिर येथे आगमन होणार आहे.
संध्याकाळी ४ वाजता ज्योतीचे स्वागत आणी वचन ग्रंथ दिंडी मिरवणूक गडहिंग्लज शहरातून काढण्यात येणार आहे. महलक्ष्मी मंदिरापासून या मिरवणूकीला सुरुवात होणार आहे. मिरवणूक आईलँड, साधना बुक स्टॉल,शिवाजी बँक, शिवाजी रोडवरून,एम.आर.हायस्कूल मार्गे बेलबागेत येणार आहे. संध्याकाळी ५ वाजता बेलबाग येथे पूज्य श्री अभिनव मृत्युन्जय महास्वामीजी यांचा प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे. प्रवचणानंतर सर्व भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा.
सोहळा श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी निडसोशी यांच्या दिव्य सानिध्यात तर श्री शिवबसव महास्वामीजी हुक्केरी आणी श्री गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी हत्तरकी यांच्या नेतृत्वाखाली आजचा सोहळा पार पडणार आहे. तरी आजच्या पहिल्या दिवसाच्या सर्व कार्यक्रमांना जास्तीत जास्त संख्येने भक्त मंडळींनी हजर रहावे असे आवाहन पट्टाधिकार सोहळा समिती मार्फत करण्यात आले आहे.