गडहिंग्लज प्रतिनिधी : अभिनव ग्लोबल डिस्कवरी स्कूलमध्ये ‘ब्लॅक आहा डे’ व मकर संक्रांती उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांना ‘ब्लॅक आहा डे’ मुळे काळ्या रंगाचे ज्ञान मिळाले तर यावेळी प्लेग्रुप वर्गाच्या मुलांचे बोरन्हाण करण्यात आले.
कार्यक्रमास चिमुकली मुले काळ्या रंगांची कपडे त्यावर संक्रांतीचे दागिने अशी वेशभूषा परिधान करून आले होते. चुरमुरे,बोरे,चॉकलेट,बिस्किट तसेच तिळगुळ यांनी चिमुकल्यांचे बोरन्हाण करण्यात आले. चिमुकल्यांनी या सोहळ्याचा आनंद लुटला. सोहळ्यासाठी मुख्याध्यापिका पूजा पाटील,सेंटर हेड श्रीमती विमल वांद्रे उपस्थित राहिले. तसेच शिक्षिका स्टेफी बारदेस्कर, श्रद्धा पाटील, दिपाली दरेकर,धनश्री कळके,शाहीन किल्लेदार,शैला पाटील,किरण चव्हाण तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी राणी इंगळे व प्रियांका कुऱ्हाडे व पालकांचे सहकार्य लाभले.