Home कृषी गडहिंग्लज ‘गोडसाखर’ ची १५ जानेवारी पर्यंतची ऊसबीले ३१११/- प्रमाणे जमा : डॉ.प्रकाश शहापुरकर

गडहिंग्लज ‘गोडसाखर’ ची १५ जानेवारी पर्यंतची ऊसबीले ३१११/- प्रमाणे जमा : डॉ.प्रकाश शहापुरकर

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : येथील आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखान्याने १५ जानेवारी पर्यंतची ३१११/- प्रमाणे ऊसबीले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली असल्याची माहिती गडहिंग्लज ‘गोडसाखर’ चे चेअरमन डॉ.प्रकाश शहापुरकर यांनी पत्रकाद्वारे दिली.

गडहिंग्लज ‘गोडसाखर’ चा यंदाच्या वर्षीचा गळीत हंगाम डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात चालू झाला. त्यावेळी पासून आजपर्यंत ८५ हजारच्या जवळपास गाळप झाले आहे. त्यापैकी १५ जानेवारी पर्यंत झालेल्या गाळपाचे प्रतिटन ३१११/- प्रमाणे ऊसबीले शेतकऱ्यांच्या खात्यावर आज(ता-१) रोजी जमा करण्यात आली आहेत. तर उर्वरित ३१ जानेवारी पर्यंतची बिले ७ फेब्रुवारी पर्यंत जमा करणार असल्याचे चेअरमन डॉ.प्रकाश शहापुरकर यांनी सांगितले असून शेतकऱ्यांनी ऊस कारखान्यास गळीतास पाठवावा असे आवाहन केले आहे.

Related Posts

Leave a Comment