Home राजकीय भाजपा अभियंता सेल जिल्हाध्यक्षपदी चंद्रकांत सावंत

भाजपा अभियंता सेल जिल्हाध्यक्षपदी चंद्रकांत सावंत

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : येथील प्रसिद्ध स्थापत्य अभियंता व आर्किटेक्टस आणि इंजिनीअर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष माजी नगरसेवक इंजिनिअर चंद्रकांत सावंत यांची भाजपाच्या अभियंता आघाडीच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली. भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांच्या सहीचे निवडीचे पत्र भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते कोल्हापूर येथील पक्ष कार्यालयात देण्यात आले.

यावेळी गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाशराव चव्हाण,भाजपचे महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारिणी सदस्य संग्रामसिंह कुपेकर,माजी राज्य मंत्री भरमू आण्णा पाटील,जिल्हा अध्यक्ष राहुल देसाई व भाजपचे गडहिंग्लज तालुका अध्यक्ष संतोष तेली उपस्थित होते. या पदासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.चंद्रकांत दादा पाटील व कोल्हापूरचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यानी शिफारस केली.

Related Posts

Leave a Comment