Home आरोग्य ऐनापूरात झाले अकरावे नेत्रदान

ऐनापूरात झाले अकरावे नेत्रदान

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : ऐनापूर (ता. गडहिंग्लज) येथे अकरावे नेत्रदान झाले. आक्काताई मारुती दड्डीकर (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्याचा निर्णय दड्डीकर कुटुंबीयांनी घेतला. गडहिंग्लज,आजरा तालुक्यात सुरु असलेल्या चळवळीतील हे ९७ वे नेत्रदान ठरले.

आक्काताई दड्डीकर यांना आज सकाळी हृदयविकाराचा धक्का बसला. उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. गावातील स्थानिक कार्यकर्त्यांनी दड्डीकर कुटुंबीयांना नेत्रदानाबाबत विचारणा केली. त्याला दड्डीकर कुटुंबीयांनी संमती दिली. त्यानंतर येथील अंकूर आय बँकेच्या पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकाने नेत्रदानाची प्रक्रिया पार पाडली.

गेल्या काही वर्षांत चळवळ चांगलीच रुजली आहे. पण, गेल्या तीन महिन्यात एकही नेत्रदान झालेले नव्हते. आक्काताई यांच्या मरणोत्तर नेत्रदानाने चळवळीला पुन्हा गती मिळाली आहे. दड्डीकर कुटुंबीयांच्या या आदर्शवत निर्णयाचे कौतुक होत आहे.

Related Posts

Leave a Comment