गडहिंग्लज प्रतिनिधी : फेब्रुवारी 2025 मध्ये झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) शिष्यवृत्ती परीक्षेत छत्रपती शिवाजी विद्यालय,गडहिंग्लजची विद्यार्थिनी कुमारी आरोही पद्मश्री अमोल गुरव हिने शहरी विभागात महाराष्ट्र राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये अकरावा क्रमांक पटकावून नेत्रदीपक यश संपादन केले. इयत्ता पाचवीमध्ये 2024- 2025 या शैक्षणिक वर्षात विविध राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धापरीक्षांमध्ये आरोहीने सुयश संपादन केले आहे.
मार्च 2025 मध्ये झालेल्या गुरुकुल टॅलेंट सर्च परीक्षेत राज्यात प्रथम,मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेत राज्यात द्वितीय,कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्यावतीने घेण्यात आलेल्या श्री.रामानुजन गणित प्राविण्यपूर्व,गणित प्राविण्य,गणित प्रज्ञा परीक्षेत बक्षीसपात्र,इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलंपियाड परीक्षेत गुणवत्ताधारक,सुपर सायन्स अकॅडमी व शिक्षण विभाग पंचायत समिती गडहिंग्लज सराव परीक्षेत तालुक्यात द्वितीय,व्ही.के. चव्हाण-पाटील कला वाणिज्य विज्ञान कॉलेज,कार्वे सामान्य ज्ञानस्पर्धा परीक्षेत आठवी,भारती विद्यापीठ,पुणे यांचेमार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत इंग्रजी विषयात राज्यात प्रथम व गणित विषयात बक्षीसपात्र,ज्ञानामृत शैक्षणिक व्यासपीठ नेसरी सरसेनापती प्रतापराव गुजर सामान्यज्ञान परीक्षेत जिल्ह्यात सातवी असे विविधअंगी परीक्षेत तिने यश संपादन केले आहे.
आरोहीला छत्रपती शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रल्हादसिंह शिलेदार,मार्गदर्शक शिक्षिका मीरा खोपकर,निवेदिता बाबर,सर्व शिक्षक वृंद यांचे मार्गदर्शन व पालकांचे प्रोत्साहन लाभले.