गडहिंग्लज प्रतिनिधी : येथील जडेसिद्धेश्वर आश्रम बेलबाग येथे गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. प्रथम समाज बांधव व भक्तांकडून श्री महंत सिद्धेश्वर महास्वामीजींना वंदन करण्यात आले. सकाळच्या सत्रात गुरुपौर्णिमेनिमित्त शहरातील बसवेश्वर चौक येथे महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याला बिल्वाश्रमाचे श्री महंत सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले.
कार्यक्रमामध्ये भक्तमंडळी आणि समाजबांधव उपस्थित होते. त्यानंतर सायंकाळी बेलबाग येथे कार्यक्रम झाला. शैला आजरी यांनी स्वागत केले. मीना इंगळे यांनी ‘गुरु’ या विषयावर आपले विचार मांडले. आपल्या जीवनात गुरूंचे स्थान किती महत्त्वाचे आहे हे त्यांनी सांगितले. त्यानंतर श्री महंत सिद्धेश्वर महास्वामीजींनी ‘गुरुमहती’ सांगितली. ‘गुरु विना कोण दाखवील वाट’ या कवितेच्या ओवीप्रमाणे आपल्या जीवनात गुरूंचे महत्त्व स्पष्ट केले. आणि स्वामीजींचा आशिर्वचन कार्यक्रम पार पडला. प्राचार्य दत्ता पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी राजशेखर दड्डी,नागापा कोल्हापुरे,अरविंद कित्तुरकर,बसवराज आजरी,विजय घुगरे,सुशील हडदारे,सुनील कोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.