गडहिंग्लज प्रतिनिधी : सतरा वर्षे गटाच्या चुरशीच्या अंतिम फुटबॉल सामन्यात न्यू होरायझन स्कुलने शिवराज स्कुलला टायब्रेकरवर३-१ असे नमवुन विजेतेपद मिळविले. चौदा मध्ये सर्वोदया स्कुलने गडहिंग्लज हायस्कुलला १-० असे हरवून अजिंक्यपद पटाकाविले. होरायझनचा वीर पाटील, सर्वोदयाचा समर्थ सुतार यांनी चौफेर खेळ करून स्पर्धावीराचा बहुमान मिळविला. गेले तीन दिवस शिवराज महाविद्यालयाच्या मैदानावरील स्पर्धेत २२ संघानी सहभाग घेतला होता. येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन मार्फत हत्ती-कोले- षण्मुगम यांच्या स्मृतीपित्यर्थ झालेल्या या स्पर्धेचे यंदाचे चौदावे वर्ष होते.
सतरा वर्षाखालील अंतिम सामन्यात गतविजेत्या शिवराज स्कुलला होरायझन स्कूलने झुंझार खेळ करून गोल शून्य बरोबरीत रोखले. टायब्रेकरमध्ये होरायझनचा हुकमी गोलरक्षक वीर पाटीलने शिवराजच्या खेळाडूंचे दोन पेनल्टी फटके अडवून विजयात मोलाचा वाटा उचलला. होरायझनच्या वीर पाटील,ओमकार चौगुले,समर्थ कापसे यांनी तर शिवराजच्या केवळ अखिलेश कुराडेलाच गोल मारता आला. चौदा वर्षाच्या अंतिम सामन्यात सर्वोदया स्कुलचा भरवशाचा खेळाडू साई कडूकरच्या निर्णायक गोलच्या जोरावर शिवराज स्कुलला १-० असे हरवून विजेतेपद साकारले. गडहिंग्लज हायस्कूलच्या अनुप विटेकरी,समर्थ कुराडेची लढत अपुरी ठरली.
गडहिंग्लज युनायटेडचे संचालक संभाजी शिवारे,डॉ.राकेश बेळगुद्री यांच्याहस्ते विजेते आणि उप विजेत्यांचा गौरव झाला. जेष्ठ खेळाडू महादेव पाटील,अनिल चौगुले, सचिन बारामती,रोहन साळोखे, किरण कावणेकर, सौरभ जाधव यावेळी उपस्थित होते. ओमकार जाधव यांनी स्वागत केले. प्रशिक्षक दिपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकात स्पर्धेचा आढावा घेतला. स्पर्धा समन्वयक श्रवण जाधव, सश्रृत सासने यांचा सत्कार झाला. सुरज कोंडूस्कर,सागर पोवार,सुरज हनिमनाळे,अमर गवळी,सर्वेश मोरे, अवधुत चव्हाण यांनी पंच म्हणून काम पाहिले. दरम्यान, उपांत्य फेरीत सर्वोदया स्कुलने शिवराजला टायब्रेकरवर नमवून अंतिम फेरी गाठली होती.
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट
खेळाडू – १६ वर्षे १४ वर्षे
स्पर्धावीर – वीर पाटील(होरायझन),समर्थ सुतार (सर्वोदया)
गोलरक्षक – जगदिश चौधरी(गारगोटी),नील पाटील (सर्वोदया)
बचावपटू- वेदांत कोगे (होरायझन), अनुज खोत (सर्वोदया)
मध्यरक्षक – अखिलेश कुराडे (शिवराज),अनुप विटेकरी (गडहिंग्लज हायस्कूल)
आघाडीपटू – अजिंक्य घोरपडे (गडहिंग्लज),रुद्र पाटील (गारगोटी)