Home Uncategorized ‘अभिनव’ च्या विद्यार्थ्यांचा स्कॉलरशिप परीक्षेमध्ये राज्यात ‘डंका’

‘अभिनव’ च्या विद्यार्थ्यांचा स्कॉलरशिप परीक्षेमध्ये राज्यात ‘डंका’

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याच्या यादीत स्कॉलरशिप परीक्षेमध्ये अभिनव आयआयटी मेडिकल फाउंडेशनच्या तीन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये ‘अभिनव’ आयआयटी मेडिकल फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळवले आहे. यामध्ये सौश्रुती अमित पुंडपळ (राज्यात द्वितीय) विवेक धनाजी पाटील (राज्यात आठवा) स्वराज प्रवीण निंबाळकर (राज्यात आठवा)अनुक्रमे नंबर मिळवले आहेत.

यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष डॉ.अमोल पाटील,सचिव प्रा.संतोष पाटील,मुख्याध्यापक अभिजीत पाटील,मार्गदर्शक शिक्षक सुशांत येजरे व सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Posts

Leave a Comment