Home Uncategorized शक्तिपीठ महामार्ग होणारच.! : हा तर विकासाचा मार्ग : आ. शिवाजी पाटील

शक्तिपीठ महामार्ग होणारच.! : हा तर विकासाचा मार्ग : आ. शिवाजी पाटील

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : शक्तिपीठ महामार्ग हा तर शक्ती,भक्ती आणि विकासाचा मार्ग आसल्यामुळे कोणतेही राजकारण न करता शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन सर्वांच्या विकासासाठी ‘शक्तिपीठ’ महामार्ग होणारच.! असा विश्वास चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आ. शिवाजी पाटील यांनी व्यक्त केला. ते आज गडहिंग्लजमध्ये शक्तिपीठ महामार्ग समर्थनात काढलेल्या मोर्चात बोलत होते.

चार दिवसांपूर्वी शक्तिपीठ महामार्ग विरोधात गडहिंग्लजमध्ये रास्तारोखो आंदोलन झाले होते. तर आज चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आ. शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वात शक्तिपीठ महामार्ग समर्थनात मोर्चा निघाला. सदरच्या मोर्चात गडहिंग्लज विभागातील असंख्य शेतकरी बांधव व भाजपासह मित्रापक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोर्चाने प्रांतकार्यालयावर येऊन ‘शक्तिपीठ’ समर्थानात निवेदन दिले.

यावेळी आ.शिवाजी पाटील म्हणाले कि शक्तिपीठ महामार्ग हा तर शक्ती,भक्ती आणि विकासाचा मार्ग आसल्यामुळे तो होणारच. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नागपूरपासून चालू झालेली विकासगंगा शक्तिपीठ महामार्गाच्या माध्यमातून कोकणपर्यंत जाणार आहे. शक्तिपीठमूळे आपल्या भागात पर्यटन,उद्योग-व्यवसाय,शिक्षण, रोजगार निर्मिती यासह इतर अनेक नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. विरोधकांकडून काही अपेक्षा ठेवायच्या नसतात. फक्त विरोध करायचा म्हणून विरोधक विरोध करत आहेत पण त्यांना आम्ही गंभीर घेत नाही.

शेतकरी बांधव खुप हुशार आहेत ते चांगले वाईट समजू शकतात. मी मतदारसंघात विकासाचे धोरण घेऊन वाटचाल करीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विकासपुरुष आहेत ते खुशमस्करीवर खुश होणारे नेते नाहीत. त्यांच्या विकासरूपी संकल्पनेला आमचा पाठींबा असून चंदगडचा विकास करायचा हा संकल्प ठेवून गडहिंग्लज विभागातून शक्तिपीठ महामार्गाची मागणी केली आहे.

आंदोलनकरून तोडपाणी..राजू शेट्टीना उत्तर..!
शेतकऱ्यांचे एक नेते आंदोलने करून तोडपाणी करतात. त्याच्यावर दोन हाणा खरं नेता म्हणा अशी म्हणायची वेळ आली आहे. आम्हा शेतकऱ्यांच्या पोरांची रोजगारासाठीची भटकंती थांबावी व विकास व्हावा या हेतूने आमचे समर्थन शक्तिपीठ महामार्गाला आहे.

गडहिंग्लज ‘उपजिल्हा’ होण्यासाठी आंदोलन..!

गडहिंग्लज उपजिल्हा होण्यासाठी व कोल्हापूर येथील सरकारी कार्यालयात होणारी कामे गडहिंग्लज येथेच व्हावीत व सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळावा. यासाठी माझे पुढील आंदोलन असून गडहिंग्लज उपजिल्हा होण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे आ.शिवाजी पाटील यांनी यावेळी सांगितले.

Related Posts

Leave a Comment