गडहिंग्लज प्रतिनिधी : भडगाव येथील श्री कल्लेश्वर हायस्कूलमध्ये २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षाकरीता जिमखाना निवडणूक उत्साहात पार पडली. तहसीलदार कार्यालय येथील अब्दुलसैफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्याध्यापक सुरेश मगदूम यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक घेण्यात आली. निवडणुकीच्या माध्यमातून वेगवेगळ्या समित्यांचे प्रमुख निवडण्यात आले.
शाळेतील विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी प्रभावीपणे पार पाडण्यासाठी निवडून आलेल्या मुलांना खाते वाटप करण्यात आले. त्याचबरोबर मुलांमधून व मुलींमधून जनरल सेक्रेटरीची निवड करण्यात आली. इयत्ता दहावी मधील प्रीतम भोई आणि संयोगिता मदिहाळी यांची जनरल सेक्रेटरी म्हणून निवड झाली. तसेच प्रार्थना व परिपाठ,सांस्कृतिक मंडळ,सहल,क्रीडा,ग्रंथालय,स्वच्छता,फलक लेखन,आरोग्य अशा विविध समित्या तयार करण्यात आल्या.
निवडणूक प्रक्रियेसाठी केंद्राध्यक्ष म्हणून राजश्री कोले यांनी काम पाहिले. त्याचबरोबर गोपाळ पाटील, अर्चना रक्ताडे व मनीषा कुंभार यांनी मतदान अधिकारी म्हणून काम पाहिले. बाबासाहेब मुल्ला,लक्ष्मण चौधरी व सागर सुतार यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते वसंत नाईक यांनी या निवडणूक प्रक्रियेला शुभेच्छा दिल्या. श्री. शेख यांनी निवडणूक प्रक्रिया समजावून सांगून मुलांना मार्गदर्शन केले. या प्रक्रियेत सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.