गडहिंग्लज प्रतिनिधी : चांगले पिण्याचे पाणी पाजणे म्हणजे पुण्याचे काम समजले जाते. हेच पुण्याचे काम कापशी(ता-कागल) येथील रक्ताडे कुटुंबाने केले आहे. येथील नितीन बापू रक्ताडे यांनी आपल्या आजी कै रत्नाबाई निवृत्त रक्ताडे यांच्या स्मरणार्थ पाणपोई चालू केली आहे.
विधायक-सामाजिक सेवेचा वारसा लाभलेल्या नितीन रक्ताडे यांच्या कुटुंबाने आजवर सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. तर यंदाच्या वर्षी त्यांनी गावामध्ये होत असलेल्या पाण्याची कमतरता ओळखून स्वखर्चाने कापशी येथील भोई गल्लीमध्ये आजी कै. रत्नाबाई निवृत्त रक्ताडे यांच्या स्मरणार्थ पाणपोई चालू केली आहे त्यांच्या या सामाजिक उपक्रमामुळे कापशी आणि पंचक्रोशीत ‘रक्ताडे’ कुटुंबाचे कौतुक होत आहे.