Home आरोग्य गडहिंग्लजच्या उपजिल्हारुग्णालयात ‘सी.टी.स्कॅन मशीन’ : पालकमंत्री हसन मुश्रीफांच्या हस्ते रविवारी लोकार्पण..!

गडहिंग्लजच्या उपजिल्हारुग्णालयात ‘सी.टी.स्कॅन मशीन’ : पालकमंत्री हसन मुश्रीफांच्या हस्ते रविवारी लोकार्पण..!

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : गडहिंग्लज विभागातील गोरगरीब व सर्वसामान्य रुग्णांचे आधारवड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये रविवार(ता-३१)पासून ‘सी.टी.स्कॅन’ ची सेवा सुरू होणार आहे. सी.टी.स्कॅन मशीनचा लोकार्पण सोहळा रविवार(साय.४ वाजता) पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या शुभहस्ते होणार आहे.

सदरच्या लोकार्पण सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर,खासदार संजय मंडलिक, आ.प्रकाश आबिटकर,आ.राजेश पाटील उपस्थित असणार आहेत. तर खासदार धनंजय महाडिक,खासदार धैर्यशील माने,आमदार सतेज पाटील,आमदार अरुण लाड,आमदार जयंत आसगावकर,आमदार विनय कोरे,आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजेंद्र पाटील(यड्रावकर),मा.आ. पी.एन.पाटील,मा.आ.राजू आवळे,आमदार ऋतुराज पाटील,आमदार जयश्री जाधव,मिलिंद म्हैसकर,धीरज कुमार,राहुल रेखावार,संतोष पाटील,डॉ.विजय कंदेवाड, डॉ.दिलीप माने,डॉ.राजेश गायकवाड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे.

सी.टी.स्कॅन मशीनचा लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुप्रिया देशमुख,कार्यकारी व्यवस्थापिका(क्रस्ना डायग्नोस्टिक लि.)पल्लवी जैन,वैद्यकीय अधीक्षक डॉ.चंद्रकांत खोत यांनी केले आहे.

Related Posts

Leave a Comment