Home आरोग्य गडहिंग्लज उपजिल्हारुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत खोत यांची बदली थांबवा : …अन्यथा जनआंदोलन करणार ‘गडहिंग्लजकरांचा’ ईशारा

गडहिंग्लज उपजिल्हारुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत खोत यांची बदली थांबवा : …अन्यथा जनआंदोलन करणार ‘गडहिंग्लजकरांचा’ ईशारा

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : गडहिंग्लज उपजिल्हारुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत खोत यांची झालेली बदली थांबवावी अन्यथा जनआंदोलन करणार असा ईशारा आरोग्य उपसंचालकांना निवेदनाद्वारे ‘गडहिंग्लजकरांनी’ दिला आहे.

निवेदनात म्हंटले आहे की येथील उपजिल्हारुग्णालयात प्रभारी वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असणारे डॉ. चंद्रकांत खोत यांचे कोरोना काळातील वैद्यकीय सेवा उल्लेखनीय असून नेसरी येथील चार्ज असताना देखील उपजिल्हारुग्णालयात त्यांच्यामुळे होणारी नियमित ऑपरेशन व इतर वैद्यकीय सेवा वाखण्याजोगी आहे. त्यांच्या वैद्यकीय सेवेचा गोरगरीब- सर्वसामान्य जनतेला फायदा होत आहे.

अशी उत्तम आरोग्य सेवा देणाऱ्या डॉ.चंद्रकांत खोत यांची बदली खपवून घेतली जाणार नाही. त्यांना उपजिल्हारुग्णालयात हजर राहण्याचे पुन्हा आदेश द्यावेत अन्यथा आम्ही गडहिंग्लजकर मोठे जनआंदोलन उभारू याची नोंद घ्यावी.

निवेदनावर अमर चव्हाण,शिवप्रसाद तेली,सुभाष निकम,बाळेश नाईक, बाबासो पाटील,बाळगोंडा पाटील,दिग्विजय कुराडे,कार्तिक कोलेकर,शिवाजी माने,बाळासाहेब महाडिक,शिवाजी मांगले यांच्या सह्या आहेत.

Related Posts

Leave a Comment