उत्तूर प्रतिनिधी : मंत्री हसन मुश्रीफ यांनी आरोग्यसेवा घराघरापर्यंत पोहोचविली, असे प्रतिपादन गोकुळ दूध संघाचे संचालक नविद मुश्रीफ यांनी केले. उत्तूर येथे आयोजित दिव्यांग मेळाव्यात ते बोलत होते. कागल, मुरगुड,गडहिंग्लज पाठोपाठ उत्तुरमध्येही दिव्यांग आरोग्य मेळावा घेण्यात आला.
यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ म्हणाले, ना. हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने निरंतरपणे सेवाभावी कार्य सुरूच असते. विशेष करून रुग्णसेवा आणि दिव्यांगसेवा या क्षेत्रामध्ये फाउंडेशनचे कार्य उल्लेखनीय आहे. कार्यकर्त्यांनी विविध प्रकारच्या रुग्णांसाठीचे लाभ त्यांच्या घराघरापर्यंत पोहोचवावेत. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची खरी ओळख ही “महाडॉक्टर” म्हणून आहे. गेली ३५ -४० वर्षे गोरगरिबांची आणि विशेषता: रुग्णांची सेवा अव्याहतपणे मोठ्या तळमळीने करीत आहेत.
यावेळी वसंतराव धुरे,काशिनाथ तेली,दिपकराव देसाई, शिरीष देसाई,मारुतीराव घोरपडे,रामदास आजगेकर,महादेव पाटील,अनिकेत कवळेकर,मिलिंद कोळेकर, युवराज येसने,आनंदा घाडगे,सुनील देसाई,गणपतराव सांगले,शिवाजी गुरव,बी.टी.जाधव,समीक्षा देसाई, बबन पाटील,सुरेश खोत,प्रल्हाद सावंत,डॉ.सोनवणे,डॉ सोहेल जमादार,सीपीआरचे अधिष्ठाता डॉ.प्रकाश गुरव,सुनिल रावण,रमाकांत धस आदी उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक संभाजी तांबेकर यांनी केले. सूत्रसंचालन सुनिल दिवटे यांनी केले तर आभार सुधीर सावंत यांनी मानले.