Home सामाजिक पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते साप्ताहिक ‘गावचा सरपंच’ दिवाळी अंकाचे प्रकाशन

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते साप्ताहिक ‘गावचा सरपंच’ दिवाळी अंकाचे प्रकाशन

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : गडहिंग्लज विभागातील लोकप्रिय साप्ताहिक ‘गावचा सरपंच’ दिवाळी अंकाचे प्रकाशन आज(शनिवार) गडहिंग्लज येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.

गेली १५ वर्षे साप्ताहिक ‘गावचा सरपंच’ परिवारा मार्फत दरवर्षी दर्जेदार साहित्यिकांचे लेखन असलेला दिवाळी अंक प्रसिद्ध करण्यात येतो. यंदाच्या वर्षी विविध वैशिष्ट्यांनी अंकाचे वेगळेपण साकारत सामाजिक,राजकीय,वैचारिक,ललित व मनोरंजनात्मक असे बहुविध साहित्य अंकाच्या माध्यमातून प्रकाशित केले आहे. साप्ताहिक ‘सरपंच’ दिवाळी अंकाचे स्वरूप कथा,ललितलेख,कवितांच्या पलीकडे अगदी व्यापक व वाचकाभिमुख झाले आहे. आज दिवाळीच्या निमित्ताने महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असणाऱ्या साप्ताहिक ‘सरपंच’ दिवाळी अंकाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रकाशन झाले.

यावेळी माजी जिल्हापरिषद उपाध्यक्ष सतीश पाटील,सिद्धार्थ बने,पृथ्वीराज पाटील,संदीप मोहिते,साहित्यिक प्रकाश केसरकर,महेश सलवादे,मिलिंद मगदूम,सचिन देसाई,दीपक कुराडे,अमर मांगले,मजिद किल्लेदार,उषा मांगले,काका चव्हाण यांच्यासह लेखक,कवी व संपादक नितीन मोरे उपस्थित होते.

Related Posts

Leave a Comment