Home आरोग्य गडहिंग्लजमध्ये शुक्रवारी दिव्यांग आरोग्य मेळावा : राष्ट्रवादी काँग्रेस व हसन मुश्रीफ फौंडेशनचे आयोजन

गडहिंग्लजमध्ये शुक्रवारी दिव्यांग आरोग्य मेळावा : राष्ट्रवादी काँग्रेस व हसन मुश्रीफ फौंडेशनचे आयोजन

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : गडहिंग्लजमध्ये शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने ना. हसन मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून गडहिंग्लज शहर व गिजवणे-कडगाव जिल्हापरिषद मतदार संघासाठी दिव्यांग आरोग्य मेळावा शुक्रवार(ता-७) रोजी सकाळी १० वाजता काळू मास्तर विद्यालय,शाळा नंबर-२,शिवाजी चौक,गडहिंग्लज येथे आयोजित केला आहे.

दिंव्याग तपासणी नंतर कृत्रिम जयपूर हात-पाय,काठी,वॉकर, व्हिलचेअर,तीन चाकी सायकल,कमी ऐकू येणाऱ्यांसाठी श्रवणयंत्रे असे साहित्य वाटप नियोजित वेळ निश्चित करून होणार आहे. तसेच ६० वर्षावरील नागरीकांना मोतिबिंदू,नेत्रचिकित्सा व सर्व प्रकारच्या डोळ्याच्या शस्त्रक्रिया होणार आहेत. तरी सर्व दिव्यांग बांधवांनी मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व नामदार हसन मुश्रीफ फौंडेशन यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Related Posts

Leave a Comment