Home राजकीय माजी आमदार श्रीपतरावजी शिंदे यांनी आपली विचारधारा कधीही सोडली नाही : पालकमंत्री हसन मुश्रीफ

माजी आमदार श्रीपतरावजी शिंदे यांनी आपली विचारधारा कधीही सोडली नाही : पालकमंत्री हसन मुश्रीफ

by Nitin More

गडहिंग्लज प्रतिनिधी : जनता दलाचे जेष्ठ नेते व माजी आमदार श्रीपतरावजी शिंदे यांचे आज वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार चालू होते पण आज सायंकाळी त्याचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दुःख व्यक्त केले. पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की गडहिंग्लज तालुक्याचे,कोल्हापूर जिल्ह्याचे डाव्या विचारसरणीचे आणि चळवळीचे लढा देणारे एक महान नेतृत्व म्हणजे माजी आ.श्रीपतराव शिंदे हे नेतृत्व आज आपल्यातून निघून गेले आहे.

माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांनी संपूर्ण आयुष्यभर गोरगरीब,सामान्य,कष्टकरी अशा सगळ्या लोकांसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. अनेक अंधश्रद्धा व अनिष्ट प्रथा विरोधात त्यांनी कठोर प्रहार केले. जुनाट्य व्यवस्था त्यांनी प्रबोधनातून नष्ट करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. त्यांनी संपूर्ण आयुष्य सर्वसामान्य जनतेसाठीच व्यतीत केले आणि आपली विचारधारा कधीही सोडली नाही. आजच्या जगात अनेक लाभांसाठी आणि प्रलोभनांसाठी विचारधारा बदलणाऱ्या प्रवृत्तीचा त्यांनी कायमपाणे धिक्कारच केला. अशा व्यक्तिमत्त्वाचे आपल्यातून निघून जाणं हे अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीला मी वंदन करतो.

Related Posts

Leave a Comment